पहिला प्रकल्प असल्यामुळे सखी सहेली शेतकरी महिला गट

देवळी सत्यदूत वृत्त.रेणूका दूरबुडे

देवळी- सखी सहेली महिला शेतकरी गट, पिंपळगाव लुटे येथील महिलांनी पाणी फाउंडेशन व उमेद अंतर्गत गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु केला असून त्या प्रकल्पाचे उदघाट्न आज नगराध्यक्ष किरण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. देवळी तालुक्यातील हा पाहिला प्रकल्प असल्यामुळे सखी सहेली शेतकरी महिला गटाच्या सर्व महिला सदस्यांचे किरण ठाकरे यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.हा प्रकल्प महिला सक्षमीकरणासोबतच सेंद्रिय शेतीला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या माध्यमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असून पर्यावरणपूरक शेतीसाठीही हा प्रकल्प प्रेरणादायी ठरेल.यावेळी पाणी फाउंडेशनचे राम अंभुरे, प्रविण कात्रे, मनोज नागपुरे, प्रमोद भेंडे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक हेमलता भोयर, सुप्रिया मॅडम, सी एल एफ मॅनेजर पाटील मॅडम, कृषी सहाय्यक नायर सर, ग्रामसेवक मरापे मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुबाई कांबळे, सखी सहेली महिला शेतकरी गटाच्या अपेक्षा दिघडे, भारती वाघ, प्रिया वाघ, आशा भोयर, मोनिका शिंदे, लता जाधव, महिला गटातील इतर महिला सदस्य, पिंपळगाव लुटे येथील ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.








