देवळी सत्यदूत वृत्त.
सचिन वैद्य

वर्धा : स्थानिक 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत देवळीच्या एस एस एन जे महाविद्यालयातील सार्जंट यामीनी योगीराज पारधी हिची निवड महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टोरेट च्या वतीने कोल्हापूर येथे २१ ते ३० मे दरम्यान आयोजित ‘राज्यस्तरीय आंतर विभागीय निशानेबाजी स्पर्धेकरिता झालेली आहे.
यामिनीने गेल्या दोन महिन्यापासून निशानेबाजीची तयारी करून एनसीसीच्या विभागीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केले व नागपूर विभागातून सहा मुलींची निवड झालेली आहे त्यात यामिनी ने पहिल्या तीन मध्ये आपले स्थान पटकावलेले आहे.
आपल्या यशाचे श्रेय यामिनी नागपूर विभागाचे ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास, 21 महाराष्ट्र बटालियनचे कमांडट कर्नल एस के सिंग, प्रशासकीय अधिकारी कर्नल जीसांतो, प्राचार्य डॉ सुनिता सोनारे व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांना देते. तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे






