देवळी सत्यदूत वृत्त.शंकर परचाके

वर्धा ; रयतेचे राजे शिवछत्रपती यांना राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पदाधिकाऱ्यांकडून माल्यार्पण करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मराठा महासंघाचे विदर्भ सरचिटणीस दीपक कदम , विभागीय महिला अध्यक्षा रोहिणी बाबर, जिल्हाध्यक्षा मनीषा निकम, जिल्हा उपाध्यक्ष कुंदा घाडगे, युवती जिल्हाध्यक्षा मोनाली मोहिते, शहराध्यक्षा साधना पवार,शहर उपाध्यक्ष पुनम शिंदे,नीता उबाळे अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय संस्था,धनश्री भांडेकर शहर अध्यक्ष लीनेस क्लब तसेच मराठा महासंघ पदाधिकारी जयश्री कदम स्नेहल टाकोने, नलिनी धानोरकर, लिनेस क्लब पदाधिकारी माया वावरे, सचिव नीलिमा गोटे ,सदस्या शालिनी पानसे, युवक जिल्हाध्यक्ष धीरज जाधव, एडवोकेट नंदकिशोर वानखेडे इत्यादी उपस्थित होते. जय जय महाराष्ट्र माझा या गीताने सांगता झाली.







