नागरिकांना देवळी पोलिसांचे असाह्य लोकांना मदतीचे आवाहन

नरेश जोशी यांनी मुलाचा फोटो काढून वाट्सप ग्रुपवर दिली माहिती
देवळी सत्यदूत वृत्त
सचिन वैद्य

आज दिनांक 29/05/2026 शुक्रवार रोजी सकाळी आठ सकाळपासून अचानक हरवलेला मुलगा 12 दरम्यान मिळाला कारण देवळी शहरात जवळपास दोन ते चार वर्षाचा मुलगा भटकला तो संपूर्ण गावात फिरत होता अशातच काही गाड्यांना नकळत मधात येत होता त्यामुळे निखिलच्या लक्षात आले हा मुलगा बऱ्याच वेळापासून गावात रडत , फिरत होता त्या मुलाला देवळी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले त्यामुळे निखिल व मुलाकडे पाहून सर्वांचे लक्ष वेधले त्यातच होमगार्ड वरिष्ठ पलटण नायक नरेश जोशी यांनी मुलाचा फोटो काढून वाट्सप ग्रुप वर माहिती पाठवली पण काही क्षणात हरविलेल्या मुलाची आई रिया सुदेश कुमार सिंग राहणार बिहार , MIDC कामगार वडील सुदेश कुमार सुदीश सिंग राहणार बिहार , घर मालक राकेश काशीराम धुर्वे घरमालक राहणार लोकमान्य टिळक नगर वार्ड नंबर 3 देवळी यांनी गावात शोध घेतला पण मिळून आला नाही काही लोकांनी कल्पना दिली की अखं गाव CCTV मधे करा म्हणून चेक करू या भावनेतून आले यावेळी मुलगा कुठे गेला की कुणी नेला ते पाहण्यासाठी आले.

असता अचानक मुलाकडे वडिलाचे लक्ष जाताच वडिलांच्या डोळ्यात पाणी आले आणि मुलाने रडत मिठी मारली देव तारी त्याला कोण मारी त्यातच आज देवाचे रूप निखिलच्या रूपात पाहायला मिळाले. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाजवळ मदत करायला वेळ दिसत नाही. काही बोटावर मोजण्यासारखे काम वेळ बाजूला ठेऊन मदत , सहकार्य करीत असतात त्यामुळे देवळी पोलिसांकडून हरविलेल्या अनओळखी व्यक्ती आढळ्यास स्टेशनला माहिती द्यावी शक्य झाल्यास आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले. हरविलेल्या मुलाला आई व वडिलांच्या स्वाधीन केले. त्यामुळे सर्वत्र नागरिकांना आनंद आणि निखिल निखाडे व पोलिस , होमगार्डचे कौतुक व्यक्त होत आहे.
खालील फोटो मध्ये आई, वडील व मुलगा, घरमालक








