
देवळी सत्यदूत वृत्त.हर्षाली सातघरे

हिंगणघाट :- इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९५.८० टक्के गुण मिळवनाऱ्या सर्वसाधारण कुटूंबातील कु. श्रुतिका देविदास महाबुधे हिचा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी कु. श्रुतिक देविदास महाबुधे हिचे अभिनंदन करत तिच्या यशामागील मेहनत, जिद्द आणि पालकांचे मार्गदर्शन यांचे कौतुक केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही असेच उज्ज्वल यश संपादन करावे, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात श्रुतिका ला इंजिनियर व्हायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी स्वागत करताना शहराध्यक्ष बालू वानखेडे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, युवकचे प्रदेश सचिव प्रशात लोणकर,वाहतूक सेलचे हेमंत घोडे, सुनिल घोडखांदे, ओबीसी शहर अध्यक्ष सुनिल ठाकरे, समाजसेवक रोशन नागमोते, अब्ररार फारुकी, मोहम्मद शाहिद, राजु मुडे, आकाश हुरले, गोलू भोंग, शुभम येरेलर कुटुंबीय व परिसरातील नागरिक उपस्थित होते.






