
देवळी सत्यदूत वृत्त.रेणूका दूरबुडे

वर्धा :-आपल्या समाजात असे अनेक बांधव आहेत, जे शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या काही प्रमाणात अक्षम आहेत आपल्या सारख्ने सामान्य आयुष्य जगण्यासाठी त्यांना अनेकदा विशेष मदतीची आणि साधनांची गरज भासते. दिव्यांगांना दैनदिन कामे करणे, शिक्षण घेणे किंवा कामावर जाणे यासाठी विविध उपकरणांची गरज लागते नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तर्फे व्हीलचेअर, वॉकर व वाकींग स्टीक अशा आवश्यक वस्तू दिव्यांगासाठी वरदान आहे. ही आवश्यक साधने केवल वस्तू नसून त्यांच्यासाठी आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याचे माध्यम आहेत. या मदतीने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपली स्वप्णे पूर्ण करू शकतात. त्यांना स्वावलंबनाचे पंत्र देणे, हेच खरे मानवी कर्तव्य आहे. असे प्रतिपादन वर्धेचे ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबु अग्रवाल यांनी व्यक्त केले.ते १७ मे रोजी गजानन महाराज देवस्थान मंदिराच्या सभागृहात नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई शाखा वर्धा तर्फे स्वः बिसन जानु कुमरे मुंबई व स्व. मारग्या कुमरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित दिव्यांग व्यक्तींना उपयोगी साहित्य वितरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष सुधिर पांगुळ तर प्रमुख अतिथी म्हणून नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे, आर्वीचे ज्येष्ठ समाजसेवी श्यामसुंदर राठी, बुलढाणा अर्बन को-सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक राजेश बगाडे ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र चांदेकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण धोपटे, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, जयहिंद सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष, अ. सत्तार इनामदार, सत्याश्रम मंडळाचे सचिव विजय सत्यम माजी बैंक अधिकारी दिलीप मसने, स्नेहालय संस, राजु लभाणे, नाना पहाडे, उल्हास वाघ, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, समाज सेविका कविता भस्मे प्रदेश संघटक हरीष तांदळे, मधुबाबु अग्रवाल डॉ. हेलन केअर अंध व अपंग संस्थेचे सचिव प्रकाशसिंग बावरी, समाजसेवी धर्मदेव कुमरे, दिव्यांग वेलफेअर असोशिएशनचे उपाध्यक्ष भिमराव वाघ, आदी मान्यवर मंचावर उपास्थित होते.समाजात बदल घडावे, समाजाने सहानुभूती नव्हे, नात्याने पुढे यावे तेव्हाच खरा बदल स्वीकार होईल प्रत्येक दिव्यांग माणूस म्हणून जगेल अशी भावना नगराध्यक्ष सुधिर पांगुळ यांनी व्यक्त केली. दिव्यांगांना केवल सहानुभूती नको, तर त्यांना संधी हवी आहे. असेही त्यांनी नमुद केले. सरकार अनेक योजनामधून या वस्तू उपलब्ध करून देते, पण समाजातील मान्यवरांनी आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेवून अशा आवश्यक वस्तू दिव्यांगापर्यंत पोहोचवणे ही एक प्रकारची ईव्श्ररीय सेवा आहे असे मत नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाची प्रस्तावना इमरान राही संचालन हरिष तांदळे, आभार अमोल मानकर यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजेश धोपटे, नरेश कुमरे, अमोल मानकर, दिपक अग्रवाल, अरविन्द्र तांदळे, साहिल वाघ, विक्रांत गव्हाने, आर. एन. छापेकर, मिहीर वाघ, प्रेम कवंर वैषवी पांडे, तनुश्री पांडे, धनश्री मेंद, अनिल बाबुलकर,कौस्तुभ फुलझेले, मुरलीधर कुमरे, पल्लवी कुमरे, नवीन टेकाम, भूषण कुमरे, संजय आत्राम, विवेक सुरपाम, प्रवीण आडे, साजन कोडापे, राहुल कोहचडे, मनोज सिडाम, मनोज सुरपाम आदीनी अथक परिश्रम घेतले.







