देवळी सत्यदूत वृत्त.रवींद्र पारिसे

बोपापुर (वाणी) येथील अंबिका माता देवस्थान येथे पार पडलेल्या मंगलमय परिणय विवाह सोहळ्यात वधू वर नवदांपत्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला कळम तालुक्यातील माटेगाव चे सरला ताई व किसनाजी फुलजले यांची कन्या रसिका हिचा विवाह हिंगणघाट तालुक्यातील वेळा (साखर कारखाना) चे वनिताताई व चरणदासजी भगत यांचे कनिष्ठ चिरंजीव आकाश भगत यांच्यासोबत पार पडला हा विवाह सोहळा दि. 17 मे अंतर्गत बबन ढाले यांनी हा बौद्ध विधी पद्धतीने पार पाडला घर घर संविधान उपक्रमांतर्गत नवदांपत्यांना मानव मुक्ती बौध कला मंच (शासनमान्य) मंडळाचे उपाध्यक्ष नारायण ऋषीजी जारुंडे व पाथरीचे नथुजी दुधे हिरामण भगत यांनी नवदांपत्यांना स्वागत करून आशीर्वाद दिले नारायण जारुंडे यांनी सामाजिक जाणीव रुजविणारा संदेशही दिला आणि या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले यावेळी ड्रा. डी. जी. फुलझले देवानंद फुलझले शिवदास फुलझले, मलाबाई वंजारी, सविधान फुलझले, वर्धेचे वंदना तेलंग सुवर्णा मेंढे, वर गावचे मामा कळमकर सुजाता कांबळे, सागर कांबळे, दिगंबर उंबरे, प्रकाशराव कळमकर नरेंद्र थुल दिलीप फुलझले, विलास फुलझले, बेबीबाई फुलझले, हरबाजी मून, संजय फुलझले भगत आणि फुलझले परिवारातील मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.







