देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य

नेवासा: नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव (गंगा) येथे सोमवारी शाळा प्रवेशोत्सव व स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजता प्रवेशोत्सवाची सुरुवात झाली. नवीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर रंगीबेरंगी टोपी घालून व हातात फुगे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश शिंदे, पत्रकार प्रल्हाद शिंदे, संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातही ८वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पुराणे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.”चला शाळेत जाऊया, ज्ञानाचा दीप लावूया!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.







