
देवळी सत्यदूत वृत्त सचिन वैद्य

वर्धा: ऑल इंडिया समता सैनिक दलाचे विदर्भ सचिव रमेश निमसडकर यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परभणी येथे जय हिंद सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभ परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात जय हिंद सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष सत्तार इनामदार, उद्घाटक माजी मंत्री एडवोकेट गणेश दुधगावकर, मुख्य अतिथी परभणी शहराचे उपमहापौर गणेश देशमुख, समाजसेवी चळवळीचे अभ्यासक आर .डी.मगर, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी इमरान राही यांचे हस्ते वर्धा येथील चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते, खेड्यापाड्यात जाऊन विद्यार्थ्यांना, महिलांना महामानवाच्या विचारांचे बीज पेरून त्यांच अंधारलेला आयुष्य प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करणारे रमेश निमसडकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शिबिर, विचारवेध प्रज्ञा स्पर्धा परीक्षा, दलित, पीडित ,शोषित ,आदिवासी तथा पारधी बेड्यातील विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन तथा शालोपयोगी वस्तूची वितरण करणे, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा पाया पक्का करण्यासाठी तत्वज्ञ तथा विचारवंताचे शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे यासाठी नेहमी ते क्रियाशील असतात. ते आपल्या यशाचे श्रेय चळवळीच्या कार्यकर्त्यांना देतात. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक अनिल खडतकर, आदर्श शिक्षक सुनील बाभळे, प्राचार्य विनोद जवादे, एडवोकेट निखिल बुरबुरे , आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे, जिल्हा बौद्धिक प्रमुख रचना नगराळे, डॉ.माधवी पाटील, तालुका बौद्धिक प्रमुख प्रणिता खैरकर, आंबेडकरवादी आदर्श शिक्षिका वैशाली भगत, रिपाई विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर, ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या महिला विंग महाराष्ट्र अध्यक्ष रंजना वासे, उपाध्यक्ष उज्वला इंगोले, सुरेंद्र भैसारे, जिल्हाध्यक्ष आशिष रत्नमाला नरेश लोखंडे , जिल्हा कोषाध्यक्ष प्रफुल बनसोड , जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नितीन बनकर , प्रा. पिल्लेवार, , जिल्हा उपाध्यक्ष सरिता कुसळे, तालुका बौद्धिक प्रमुख जीवन निमसडकर , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आरती निमसडकर, तालुकाध्यक्ष प्रमोद चोरपगार, संदीप थूल, चरण गायकवाड, दिलीप वैद्य, धर्मपाल गोटे, प्रबोधनकार पद्माकर कांबळे, प्रशांत भगत , जागतिक दर्जाचे चित्रकार बळी खैरे ,धीरज मुंजेवार, ऋषी सोनारकर, भारती नगराळे, विठाबाईं निमसडकर, संजय हातमोडे, प्रकाश जिंदे, यांनी अभिनंदन केले.







