देवळी सत्यदूत वृत्त. हिंगणघाट प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांचा सुविचार बालपणी आईवडिलांनी मोठे परीश्रम घेवून मुलाला घडविले. उत्तम शिक्षण देवून गाठीचा पैसा पुरवून नौकरीवर लावले. परंतु तेच आता वृध्दापकाळात आईवडिलांची अवहेलना करीत आहेत. वृध्द आईवडिलांना हिन दर्जाची वागणूक देवून संकुचित नजरेने पाहत आहेत. त्यासाठी समाजाची प्रवृत्ती बदलणे काळाची गरज झाली आहे.काळ बदलत चालला आहे तसा मनुष्यही रंग बदलत आहे. त्या आईवडिलांनी आपले लहान बाळ असतांना तळहातातील फोडाप्रमाणे जपले त्याचे शिक्षण, दैनंदिन गरजा पूर्ण केल्या व आपली आशा, आकांक्षा कमी करून मुलांना घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अशा मुलांकडूनच वृध्द आईवडिलांची अवहेलना आजच्या आधुनिक युगात होत असल्याचे दिसून येत आहे.सुगरणीच्या खोप्याप्रमाणे कुटुंबात नाते जोपासण्यात येतात मात्र लहान मुले मोठे झाल्यावर आईवडीलांची अवहेलना करतात. ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना का केली जाते ? हा चिंतनाचा विषय आहे. जवळचे सगे सोयरेच ज्येष्ठांचीसपत्ती, पैसा, जमिनजुमला आदी कारणावरून मांडणे उपस्थित करीत असतात. उदाहरणार्थ एका कुटुंबात चार मुले असतात. चारही मुलांना वडिलांनी कमाविलेल्या घराचे किंवा शेतजमिनीचे हिस्से पडत असतात. अशावेळी एखादा मुलगा दुखावल्या जातो. त्यामुळे तो बंउ करून उठतो तर दुसरा आईवडिलांचे मीच करणार काय ? असा बोट तिसऱ्याकडे दाखवितो. चौव्या मात्र तिघांच्या भांडणात स्वतत्ता लाभ करून घेतो. असे अनेक कुटुंबात उदाहरणे देता येईल. ज्येष्ठांच्या संपत्ती प्रकरणात महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी आह. भारतात ज्येष्ठ नागरिक हा पूर्वीसारखा सुखसंपन्न राहिला नाही कारण पुरातन काळात ज्येष्ठांचे आदरातिथ्य होत असायचे ज्येष्ठांचा शब्द कुटुंबातील प्रत्येक सदस्य पाळत असायचा. घरातील संपत्तीचा हिस्सा असो किंवा कोणतेही लग्नकार्य असोत जेष्ठांचा शब्दांचा मान सर्वत्र राखत असायचे. याचे उदाहरण म्हणजे रामायणातील देता येईल जेष्ठ आईचा आदर करून श्रीरामाने घराचा त्याग केला व वनवासात निघून गेले. त्यानंतरही भारतीय संस्कृतीत अनेक काळापर्यंत जेष्ठांचा आदर करणे चालत असायचे. परंतू आताच्या काळात कुटुंब, समाज व हितसंबंध इतिहासजमा होवू पाहत आहे. याला जबाबदार कोण ? हे कोणामुळे घडते आदींचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागतो याचा विचार केला पाहिजे. आज आपल्या कुटुंबातील आईवडिल वृध्द झाले आहेत पण जेव्हा आपणही त्यांच्यासारखे वृध्द होणार तेव्हा आपल्यावरही तीच पाळी येणार याचा सदविचार आपल्या डोक्यात यायला हवा परंतू तसे होतांना दिसत नाही.ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांमधून मिळणाऱ्या पैशावर घरातीलच सुना, नाते पैशावर नजर ठेवून ज्येष्ठांच्या खिशातूनसुध्दा पैसे काढून घेत असल्याचे प्रकार घडत आहेत हि हिन दर्जाची वागणूक देवून अगदी संकुचित नजरेने पाहिजे जाते. म्हणूनच एका कवीने म्हणून चुकले, स्वार्थ साधण्या टपले हे सारे कुणी कुणाचा आधार नाही, न्याय मागावा कुणी कुणाला हि दुनिया खऱ्याची राहिली नाही हे तेवढेच सत्य आहे, सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांचे सुविचार मो 9765486350







