शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

देवळी सत्यदूत वृत्त मनवर शेख
समुद्रपूर तालुक्यातील पारोदी-बोथली शिवारात आज (दि. १३ जून) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसादरम्यान आकाशातून कोसळलेल्या विजेमुळे दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मारोतराव धोटे (रा. बोथली) यांच्या मालकीची बैलजोडी वीज पडल्याने जागीच मृत्यूमुखी पडली. या बैलजोडीची किंमत अंदाजे ₹१.५० लाख असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच, किसनाजी डहाके यांच्या मालकीच्या दोन दुभत्या गायींवरही वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही गायींची एकूण किंमत अंदाजे ₹६० हजार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.






