तेल्हारा : संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सवानिमित्त माळेगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपा जवळ संत शिरोमणी रविदास महाराज नामफलकाचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर व नगरसेवक सतीश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. संत शिरोमणी रविदास महाराज चौकामध्ये संत रविदास महाराज जयंती उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज चौक नामफलकाचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर व नगरसेवक सतीश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिवसेनेचे प्रवक्ते प्राध्यापक सचिन थाटे यांनी केले यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये या चौकामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक उभारून चौक सौंदर्यकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता उपस्थित नगरसेवकांनी स्मारक उभारण्याबाबत जागेच्या उपलब्धतेनुसार स्मारक बांधण्याबाबत ठरविण्यात येईल असे सांगितले या वेळी समाजसेवक चरद्रकांत मोरे गजानन रेवस्कर सर सचिन थाटे संतोष मेश्राम अरुण मेश्राम आशिष माठे दीपक खरंतडे सोनू सोनटक्के धनराज मेश्राम गजानन मेश्राम आकाश तुंबडे मंगेश मेश्राम मंगेश हागे शिवा राऊत शहादेव मेश्राम रोहन मेश्राम मोहित मेश्राम मारोती चव्हाण संजय टाले तसेच श्री संत शिरोमणी रवीदास महाराज चौकामधील चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




