देवळी सत्यदूत वृत्त.प्रतिनिधी : आशिष जाचक
वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कलंबनेर येथील युवा शेतकरी करण राजेंद्र साळुंखे यांनी दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.विष प्राशन केल्यानंतर त्यांना तात्काळ Mahatma Gandhi Institute of Medical Sciences येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.करण साळुंखे हे कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी सांभाळत होते. शेतीतील वाढते खर्च, आर्थिक अडचणी व ताणतणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, कुटुंबीय तसेच एक विवाहित बहीण असा परिवार आहे.या घटनेमुळे कलंबनेर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.





