देवळी सत्यदूत वृत्त.श्रेया टिकले

वर्धा: एक पाऊल नव स्वराज्याकडे या विषयावर शहरातच नाही जिल्ह्यात वकृत्व स्पर्धा भाग २ अलौकिक उपक्रम ऑगस्ट २०२६ मध्ये राबविण्यात येणार आहे व नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रथम वर्धापन दिनानिमित्त वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता पण काही कारणाने कार्यक्रमात उपस्थित नसल्यामुळे त्यांना आज वकृत्व स्पर्धक अनुष्का वैतागे , स्वतिका कोंबे , सौम्या झाडे , सानिया लोहकरे , चैताली मेश्राम अशा पाच स्पर्धकांचा राज्यस्तरीय सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर हा कार्यक्रम नव स्वराज्य न्युज जिल्हा कार्यालय वर्धा येथे दिनांक 26/04/2026 दुपारला 11 वाजता आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र गोल्हर , सचिन वैद्य , मनवर शेख , शंकर परचाके , रागिणी मैद , श्रेया टिकले , रेणुका धुर्वे , गायत्री कंगाले , आस्था फरताडे , गौतम शेडके , शीतल आष्टणकर , चैताली पवार यांच्या उपस्थित मुले , मुली , पालकांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात पार पाडन्यास सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे संचालन मनवर शेख तर आभार रागिनी मैद यांनी व्यक्त केले.







