देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य वर्धा : मानवी जिवनात सुख समाधान शांती टिकवून ठेवायची असेल तर भौतिकतेसह अध्यात्माचाही स्विकार करावा लागेल. सत्संगा पासुनच वास्तविक सुख मिळते. इश्वर कृपा विना संत मिळत नाही.सद्गुरु व्दारा दाखवलेला मार्गच भक्तांना संत गजानन महाराजांचे दर्शन घडवतो जास्त अपेक्षा आणि वाईट संगत हेच माणसाचे दुःखाचे खरे कारण आहे. जगात सर्व ठिकाणी ईश्वर व्याप्त आहे. बुध्दीव्दारे धन संपत्ती ची कमाई करता येते पण बुध्दीव्दारे प्रतिष्ठा प्राप्त करता येत नाही. चिंता व चितामध्ये फक्त एक बिंदु चा फरक आहे, पण चिता मृत माणसाला नष्ट करते पण चिंता जिवंत माणसाला संपवून टाकते. मानवाने २१ व्या शतकात विकासाचे शिखर गाठले असले तरी सुख आणि समाधाना पासुन आजही तोवंचित आहे. समाजात विभीन्न धर्म संप्रदाय नाव वेगवेगळे असली तरी देव एकच आहे. श्रीमद् भागवत कथेत पुर्ण जिवनाचे सारसमाविष्ट आहे असे मार्गदर्शन अयोध्येच्या भागवताचार्य महामंडळेश्वर देवी मंजुलता यांनी केले.स्थानिक मगनवाडी चौक स्थित श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रीच्या १४८ व्या प्रगटदिन प्रित्यर्थ श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी त्या मार्गदर्शन करित होत्या. सकाळी कावड यात्रेने पवनार च्या नदी वरुन आणलेल्या पवित्र तिर्थाने श्री चा अभिषेक करून श्री व सौ. राजकुमार जाजु यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. सोमवार दि. २ फेब्रुवारी ते दि. ८ फेब्रु. पर्यत दररोज दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत भागवत कथा होणार आहे. या वेळी सुरुवातीला देवस्थानचे अध्यक्ष मोहनबाबू अग्रवाल, सचिव ज्ञानेश्वर पहाडे, कोषाध्यक्ष सुशिल व्यास, विश्वस्त मधुसुदन अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथ पुजन व देवी मंजुलाताचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत महात्म्य व गोकर्ण कथेवर त्यांनी प्रकाश टाकला. सौ. मंजुषा काळे व संच व्दारा हरिपाठ सादर केल्यावर आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. उत्सव यशस्वी करण्याकरिता बाबाराव फाले, अजय लांबट, सुरेश मंजेवार, अंबादास तळवेकर गुरुजी, अंकुश साबळे, महेश राठी, अरविंद पाल, रामदास दुधाने, रेखा अमृतकर, सौ. कल्पना पोकळे आदि. सहकार्य करत आहे.या उत्सवात आयोजिलेल्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.





