देवळी सत्यदूत वृत्त. सचिन वैद्य देवळी:’शरद ग्रामीण विकास बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित डायमंड नर्सिंग इन्स्टिट्यूट, देवळी जिल्हा वर्धा च्या वतीने ए .एन. एम .व जी .एन. एम. विद्यार्थ्यांचा लॅम्प लाइटिंग कार्यक्रम सोमवार दिनांक २/२/२०२६ भोंग सभागृह येथे संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमे समक्ष विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला .सदर कार्यक्रमाच उद्घाटक राजेश बकाने आमदार, देवळी पुलगाव, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ वर्धा तसेच प्रमुख अतिथी राहुल चोपडा उपाध्यक्ष न. प.देवळी तसेच सतीश जगताप अध्यक्ष वर्धा जिल्हा संघ वर्धा समर्थ शिरसागर तहसीलदार देवळी, हाजी अब्दुल हमीद संस्थापक शरद ग्रामीण विकास शिक्षण संस्था बहुउद्देशीय देवळी, प्रमोद तिगावकर अध्यक्ष, सय्यद अली पटेल उपध्याक्ष, अब्दुल रहेमान सचिव शरद ग्रामीण विकास बहुउद्देशीय शिक्षण संस्था देवळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्राचार्या प्रियंका ठेंगडी डायमंड नर्सिंग इन्स्टिट्यूट देवळी व शिक्षक वृंद इंगोले ,तडस , सीमा , आश्लेषा बनसोड ,शितल मेघे ,अनाम शेख ,साक्षी घवघवे, वैष्णवी नवघरे व शिक्षकेत्तर अनिल सावरकर, विवेक कानतोडे व प्रियंका जगताप तसेच सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.






