देवळी सत्यदूत वृत्त.हर्षाली सातघरे
हिंगणघाट,दि.११ फेब्रुवारी प्रखर राष्ट्रप्रेमी,उत्कृष्ट संघटक,एकात्म मानवतावाद तसेच अंतोदयाचे प्रणेते श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज दि.११ रोजी स्थानिक भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पुण्यतिथी साजरी केली. स्थानिक आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी पंडित दीनदयाळ यांना अभिवादन करीत त्यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष कुंटेवार, हिंगणघाट नगरपरिषदचे गटनेता भूषण पिसे , नगरसेवक रवींद्र रोहनकर , संजय मगर, महेश वैद्य, रविकांत डोळसकर, प्रमोद कडवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.






