देवळी सत्यदूत वृत्त.
विजय जंगले
पुलगांव : दलितामधील ६०-६५ चळवळीचे एकत्रिकरण झाल्या शिवाय तसेच अनुबंधशिवाय डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वागिन स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्या अभावी दलितानी पाहिलेले समता-स्वतंत्र-बंधुता, न्याय, प्रज्ञा, शील, करुणा, हे स्वप्न कुचकामाचे आहे. समाजाला बाबासाहेबानी दिलेल्या धुरेचे विसर पडले आहे. म्हणून च समाजाचे चित्र विदारक आहे. प्रबोधन कार कवि गायक साहित्यिकानी आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय, आरोग्य, रोजगार, निवास, नौकरी, उपासमारी, जातपात, शोषण, भ्रष्टाचार, इत्यादिवर लेखन करुन समाज जागृत करावा आणि रंगभूमिवर हे विषय सादर करावे, असे जागतिक दर्जा चे जेष्ट साहित्यिक डाँ. रमेशचंद्र येशनकर यांनी प्रतिपादन केले.
पुलगांव येथे प्रबोधनकार कला साहित्य संघाचे तृतिय संम्मेलन पार पडले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाँ. येशनकर 'अम्बेडकरी चळवळीत कला व साहित्याची भूमिका' या विषयावर बोलत होते. अध्यक्ष डाँ. भूषण रामटेके, डॉ. वसंत शेंडे, मोरेश्वर सहारे, प्रा. सतीश चाहदे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, कविता ब्राम्हणकर, दीपक भंडैकर, गीतकार के. पाटील, पत्रकार पदमाकर कांबले आदि मान्यवर उपस्थित होते.
द्विदिवसीय संम्मेलन संचालन श्री. सहारे, किरण उपाधे यांनी केले तर शेवट 'अवाज परिवर्तन' गित गायन कार्यकामतुन झाला.






