देवळी सत्यदूत वृत्त.संभाजीनगर प्रतिनिधी : नरहरी ज्ञानोबा राठोड
बारावी HSC पेपरसाठी आष्टी शाळेत कडक पोलीस बंदोबस्तआष्टी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (HSC Board) च्या बारावी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आष्टी येथील परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा केंद्र परिसरात पोलीस, फ्लाइंग स्क्वॉड पथक, पर्यवेक्षक आणि CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन, चिठ्ठ्या किंवा बाहेरील मदत घेऊ नये यासाठी तपासणी करण्यात येत आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांना शांततेत परीक्षा देण्याचे आवाहन केले असून कॉपी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. उपस्थित 13 पोलीस अंमलदार दहा होमगार्ड दोन अधिकारी यांच्यामार्फत कडक बंदोबस्त करण्यात आले.






