छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यांच्या विचाराने प्रेरित होने ,हिच काळाची गरज
देवळी सत्यदूत वृत्त.आशिष जाचक
वर्धा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,पराक्रमी व दूरदर्शी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे.शिवजयंती हा स्वाभिमान , शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा दिवस आहे. मात्र उत्सव साजरा करतांना ढोल तासे, डिझे , फटाके,आतिष बाजी यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळून संयम पाळणे आवश्यक आहे. महाराजांनी सदैव शिस्त,अनुशासन आणी रयतेच्या हिताला सर्वोचं स्थान दिले त्यामुळे जयंती साजरी करतांना समाजातील जेष्ठ नागरिक , रुग्ण , विधार्थी आणी लहान बालकांचा विचार होने अपेक्षित आहे. याच अनुष्णगाने शिवजयंती निमित्य समाजिक व प्रेरणादायि उपक्रम राबवण्याचे आव्हान करण्यात येत आहे. स्वछता मोहीम , वृक्षरोपण , रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी,गरजू विधार्थी यांना शैक्षणीक साहित्य वाटप,तसेच व्यसनमुक्ती व देशभक्ती,शिवचारित्र्यावर व्याख्यानाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. अश्या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे प्रत्यक्ष्य आचरण घडू शकते. शिवजयंती ही केवळ जल्लोषाची नव्हे तर समजपरिवर्तनाची संधी आहे. पर्यावरण पूरक ,शांततापूर्ण आणी उपक्रमशील पद्धतीने जयंती साजरी करून,स्वछ,शिस्तबद्द्ध व संवेदनशिल समाज उभारणे,हिच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी मानवदंना ठरेल.






