देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य
देवळी: राज्यातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आदरणीय वैशाली प्रवीण राऊत यांची महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक पदावर महाराष्ट्र शासन मार्फत नियुक्ती करण्यात आली. वैशाली प्रवीण राऊत ह्या देवळी तहसील अंतर्गत असलेल्या आंजी या गावातील रहिवासी असून यांच्या अथक परिश्रमाने महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक पदावर नेमणूक झाल्यामुळे विदर्भा बरोबर वर्धा जिल्हा व देवळी तहसीलचा गौरव वाढविला. त्यांच्या या नेमणुकीबद्दल डायमंड नर्सिंग इन्स्टिट्यूट देवळीचे सचिव अब्दुल रहेमान सर, प्राचार्य प्रियांका ठेंगडी मॅडम व शिक्षकगण यांच्या वतीने वैशाली प्रवीण राऊत यांचे शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.






