देवळी सत्यदूत वृत्त.हर्षाली सातघरे
दिनांक २२ फेब्रुवारी हिंगणघाट:- गिमाटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड वणी युनिट या कंपनीत रिंगफेम विभागात श्री मारोती चामचोर रा.आजंती हा कामगार म्हणून कार्यरत होता त्यांचा दिनांक ०३/१२/२०२५ ला हृदयविकाराने मृत्यू झाला त्या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार श्री समिरभाऊ कुणावार व संघटनेचे उपाध्यक्ष श्री मिलिंदजी देशपांडे यांच्या निर्देशानुसार नुसार मा. फॅक्टरी मॅनेजर श्री पठाण साहेब यांना पाठपुरावा करून मृत कामगार परीवाराला मदतीचा हात म्हणून कामगारांच्या करारा प्रमाणे प्रती कामगार १००/ रूपये पगारातून कपात करुन एकूण रक्कम १३६२००/ रूपये धनादेश देण्यात आला त्या वेळी उपस्थित संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री पांडुरंग बालपांडे, दामोदर देशमुख,जिवण भानसे जयंत बावणे,प्रशांत शेळके, राकेश तराळे, हेमंत भगत, विनोद कावळे, श्रावण थुटे, मनोहर जुमडे, विजय थुल, राहुल देशमुख, विनोद कोल्हे,लक्ष्मन जयपुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते..




