देवळी सत्यदूत वृत्त.
मनवर शेख
समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वायगाव ( ह.) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळेस ग्रामविकास अधिकारी अर्चना तपासे माजी सरपंच उत्तम घुमडे संदीप जीभोले विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष (सावरखेडा ) पोलीस पाटील आशिष पाटील स्वप्निल पाटील कडूजी दांडेकर पितांबर घुमडे प्रीतम मोरे आसाराम पाटील आशिष शंभरकर प्रकाश शेंडे रंजना नरड संगीता पोथारे रेखा जांगडेकर कैलास डांगे कपिल लोहकरे योगीराज वैद्य सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला.





