देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य
श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे मराठी विभाग तर्फे मराठी भाषा दिनाचेआयोजन साजरा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रा. डॉ भारती खापेकर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी मराठीचे महत्व समजावून सांगितले आणि कवी कुसुमाग्रजाचे कविता उलगडून दाखविला व त्याचे महत्व समजावून सांगितले. कॉलेज चे प्राचार्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ आस्कर,डॉ मोटघरे, डॉ गहारवार, डॉ चेतन राऊत उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सुंदर पारपाढण्यासाठी मराठी डिपार्टमेंट चे ड्डॉ पद्मिनी दुरुदकर, डॉ प्रणाली म्हात्रे, डॉ सीमा बेहेरे, स्मिता शहाणे, डॉ देवेंद्र तातोडे, कविता दुर्गे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्मिता शहाणे यांनी केले तर सुंदर असे आभार प्रा. कविता दुर्गे यांनी केले. प्रा डॉ प्रणाली म्हात्रे





