देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य

क्रमबध्द आणि तर्कशुद्ध रीतीने आपल्या आणि सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान ऐकत्र करून त्या ज्ञानाला पडताळून बघता येईल अशा नियम आणि सिद्धांतात बध्द करण्याच्या प्रक्रियेला विज्ञान असे म्हणतात. विज्ञान म्हणजे कारण जाणून घेण्याची उत्सुकता, ही उस्तुकता जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत मनूष्य अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या वाटेवर चालत राहणार, याच विज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन तंत्रज्ञानाची शोध लागले. म्हणूनच विज्ञानाचे महत्त्व नविन पिढीला कळावेत, या हेतूने २८ फरवरी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सर सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या रमन इफेक्टच्या स्मरणार्थ भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगणघाट येथे विज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी ला विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन हिंगणघाट शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नैना तुळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध विभागातील अभ्यासक्रमावर पोस्टर, रांगोळी, लघुप्रयोग व विज्ञान प्रतिकृतींची सुंदर प्रदर्शनी भरवण्यात आलेली होती. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, प्रमुख अतिथी श्री. दूर्गाप्रसाद यादव, मास्टर ट्रेनर मॅथ्स फ्रॉम आय. आय. टी. मुंबई, विशेष अतिथी विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश रोडे, फाॅर्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे, ब्रिलियंट स्कूलचे प्राचार्य विलास राऊत, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ.राजविलास कारमोरे , मातोश्री महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सपना जयस्वाल आणि विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल धार्मिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल धार्मिक यांनी केली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मार्गदर्शन करताना दूर्गाप्रसाद यादव यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विज्ञानातील शोध याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धैचे आयोजन करण्यात आले होते आणि सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. प्राजक्ता गुडदे व कु.सृष्टी गंधारे यांनी केले व अतिथींचे आभार कु. वेदांती मांडवकर हीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भौतिकशास्त्र विभागातील प्रा. किर्ती बावणे प्रा. कल्याणी हिवरकर, प्रा. रोहिणी बोरकर, प्रा. समिक्षा पवार, रसायनशास्त्र विभागातील प्रा. अंबिका ठवरी, प्रा. दिपाली दुधे, प्रा. वैष्णवी गोंगल, प्राणीशास्त्र विभागातील प्रा. तेजस्विता सहस्त्रबुद्धे, वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. दर्शना रेंढे, प्रा. मानसी चौधरी, प्रा. श्रेया गायकवाड, गणितशास्त्र विभागातील प्रा. किरण कष्टी, प्रा. मयुरी धोंडे, प्रा. राकेश लोणकर व संगणक शास्त्र विभागातील प्रा. आरती नांदुरकर यांचे मोलाचे योगदान लाभले.कार्यक्रमाला विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे व मातोश्री महिला महाविद्यालयातील बी. एस. सी. प्रथम, द्वितीय व तृतीय आणि एम. एस. सी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.






