देवळी सत्यदूत वृत्त.हर्षाली सातघरे

मातोश्री आशाताई कुणावार कला,वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत “ Youth for My Bharat, Youth for Digital Literacy” या संकल्पनेवर आधारित सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजा दहेगाव, तालुका हिंगणघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच संपन्न झाले. या शिबिराचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 23 फेब्रुवारीला मा. कपिलजी हाटकर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. उमेश तुळसकर हे होते, तर मुख्य अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव तथा हिंगणघाट नगरीच्या नगराध्यक्ष मा. डॉ. नयना तुळसकर, माननीय श्री. श्रावण खडसे (सरपंच, दहेगाव) व सौ. कल्पना जामुनकर (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, दहेगाव) रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.भाग्यश्री साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. शिबिरस्थळी राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करते याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्राबद्दलचे प्रेम व समाजाबद्दलची आपुलकी निर्माण करण्यात श्रमसंस्कार शिबिराचा वाटा कसा आहे याची जाणीव मा. डॉ. नयना तुळसकर यांनी आपल्या भाषणातून करून दिली. अध्यक्षीय भाषणात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व डॉ.उमेश तुळसकर यांनी अधोरेखित केले व विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मीनाक्षी पावडे तर आभार प्रा. अंबिका ठवरी यांनी मानले. या सात दिवशीय शिबिरादरम्यान स्वयंसेविकांसाठी योगसाधना, प्रार्थना, बौद्धिक सत्र, एड्स जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान तसेच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना विकसित झाली. बौद्धिक सत्रात प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हिंगणघाट, प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे तुळसकर ग्रुप ऑफ फार्मसी, श्री. एलकेवार सर वनाधिकारी वनविभाग, श्री शुभम सोरते (शिव व्याख्याता), डॉ. नितीन अखुज सर, डॉ. राजकुमार रामटेके आदी मान्यवरांची विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. डॉ. उमेश तुळसकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डॉ. नयना तुळसकर, श्री. श्रवण खडसे (सरपंच, दहेगाव), सौ. कल्पना जामुनकर (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, दहेगाव), उपप्राचार्य प्रा. मेघश्याम ढाकरे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी, विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर तसेच प्रा. भाग्यश्री साबळे (रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी, मातोश्री महिला महाविद्यालय, हिंगणघाट) उपस्थित होते. कार्यक्रमाचा सार म्हणजेच अहवाल वाचन उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल यांनी केले. एन.एस.एस. सी आर. तनुजा बाहुरे या स्वयंसेवीकेने सात दिवशीय शिबिरा बाबत आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरामध्ये स्वयंसेविकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ.उमेश तुळसकर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अजय बिरे यांनी केले तर आभार प्रा. भाग्यश्री साबळे यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मातोश्री महाविद्यालयातील प्रा. आशा घाटे, प्रा. प्रतिभा दुबे, प्रा. संगीता लांडगे, प्रा. पुनम बुरीले, प्रा. मानसी चौधरी, प्रा.दुधे, प्रा. रजनी फुटाणे, प्रा. रोशनी नरवडे, प्रा. खुशबू कातूरवार, प्रा. आरती नांदुरकर, प्रा. मीनाक्षी जिडगीलवार, मयुरी सायंकार शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी तसेच स्वयंसेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.





