देवळी सत्यदूत वृत्त.वर्धा प्रतिनिधी : तुषार रेड्डीवार

सिंधी मेघे येथील देहणकर लेआउट परिसरात, दुर्गा माता मंदिराजवळ कार्यरत असलेले मेंडेवार कोचिंग क्लासेस हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्ह केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. कमी विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन उत्कृष्ट निकाल मिळवून देणे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.संस्थेच्या संचालिका वैशाली व्ही. मेंडेवार या १५ वर्षांचा अध्यापन अनुभव असलेल्या मार्गदर्शक असून त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नियोजनबद्ध व सखोल तयारी करून दिली जाते. विशेषतः नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी येथे दर्जेदार मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून यशाची शक्यता अधिक बळकट होते.यावर्षी या कोचिंग क्लासेसमधील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या सातत्यपूर्ण यशामुळे संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे.सध्या इयत्ता ८वी ते १०वी (CBSE व राज्य मंडळ) साठी प्रवेश सुरू असून, विशेषतः विज्ञान विषयासाठी सखोल व परिणामकारक मार्गदर्शन दिले जाते. अनुभवी अध्यापन पद्धती, नियमित सराव आणि वैयक्तिक लक्ष यांच्या जोरावर या संस्थेने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.





