देवळी सत्यदूत वृत्त सुरेश भगत/ समुद्रपूर

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या माहेश्वरी मंगेश गिरडे हिने आपल्या जिद्दी, कर्तृत्व आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मानाचा ठसा उमटवला आहे. तिची प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कारासाठी निवड झाली असून, येत्या ११ मे २०२६ रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे विश्व युवा केंद्र चणकापूरि इथे तिचा भव्य सत्कार होणार आहे.भारत सरकारच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला Ministry of Tourism अणि High Commission of Sri Lanka यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दिल्लीतील प्रतिष्ठित Vishwa Yuvak Kendra येथे होणाऱ्या प्रोजेक्ट पॉईंट च्या या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.कार्यक्रमात देशातील विविध राज्यांमधून निवड झालेले युवा सहभागी होणार असून, दुसऱ्या अंतिम यादीत महाराष्ट्रातून निवड झालेली महेश्वरी गिराडे ही एकमेव प्रतिनिधी ठरली आहे. तसेच Ministry of Youth Affairs and Sports, NITI Aayog आदी संस्थांतील मान्यवरांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.महेश्वरी गिरडे ही आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारी पहिली पिढीतील मुलगी असून, ग्रामीण पार्श्वभूमीतून येत तिने अत्यंत कमी वयात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य युवक संसदेत मंत्री म्हणून काम करत तिने नेतृत्वाची क्षमता सिद्ध केली आहे, तर एक प्रभावी वक्त्या म्हणून अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ती विजेती ठरली आहे.सामाजिक बांधिलकी जपत तिने Nehru Yuva Kendra Sangathan आणि Universal Peace Federation यांसारख्या संस्थांबरोबर कार्य करत महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि युवक नेतृत्वासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तिच्या कार्याची दखल घेत तिला *सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार तसेच महाराष्ट्र रत्न पुरस्कार यांसारखे मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.*महेश्वरी गिराडे हिचा हा प्रवा—शेतकऱ्याच्या घरातून राष्ट्रीय मंचापर्यंत—अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे. ‘जय जगत’ या संदेशातून युवा शक्ती आणि नेतृत्वाची नवी दिशा अधोरेखित होणार आहे.






