देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य
महागांव दि 31 तालुक्यातील काळी दौ येथील सामाजिक कार्यकर्त्यां संध्या संदेश रणवीर यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात देत असलेल्या भरीव योगदानाबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व यथोचित सत्कार करून सोनारी फाटा,हिमायतनगर येथील आयोजित 9 व्या बौद्ध धम्म परिषदेत प्रदान करण्यात आला.सन्मानपत्रावर माजी आमदार माधवराव पाटील जळगांवकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, मा खासदार रवींद्र चव्हाण, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शेख रफिकभाई नगराध्यक्षा हिमायतनगर, त्रिरत्नकुमार भवरे, संयोजक तथा अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड यांच्या सह्या असून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार संध्या रणवीर यांना प्रदान करण्यात आलाशेतकरी,गरीब,कष्टकरी, युवक,युवती,विध्यार्थी,निराधार,निराश्रित,मोर्चे निवेदने, प्रमुख सामाजिक प्रश्नावर शासणाचे लक्ष वेधने,स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना मदत, पेट्रोल पंपावरील असुविधेवर घनघात, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी मदत मिळावी यासाठी प्रयत्न यासाठी महिला सक्षमीकरण, मानव विकास मिशन बस विध्यार्थिनींसाठी सुरु झाली पाहिजे यासाठी प्रयत्न, सबळीकरण, रमाई घरकुल निधी वाढ,निराधारांना बोनस,समतेच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी निवेदने, आरोग्य शिबिरात भाग, महिला सक्षमीकरणात गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप,मुद्रांक विक्रीतील गैरप्रकार उघडकीस आणून घनाघात,सिंचन विहीर 500 फूट अंतर रद्द करण्याची मागणी सरकारने मान्य केली,पांदण रस्त्याचे प्रश्न उचलले,माहूर पोहरादेवी धार्मिक स्थळाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी परिवहन मंत्र्यांना निवेदनातून केलेली मागणी यशस्वी ठरली अश्या नानाविध सामाजिक व कामाची महिला मधून समतेच्या विचाराचा जागर करणारी कार्य महिला व युवतीसाठी प्रेरणादायी असल्याने अथक परिश्रम आणि विधायक विचारातून संध्या रणवीर यांनी आपले व्यक्तिमत्व अल्पावधित घडविले जे नव्या पिढीला प्रेरणादायी असून त्यासाठठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक व राजकीय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजन समितीने यावेळी घोषित केले






