देवळी सत्यदूत वृत्त प्रतिनिधी शंकर परचाके

वर्धा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा यांच्या वतीने स्थानिक स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात एम. एस. डब्ल्यू भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी ,प्राध्यापक व स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमानदरम्यान विविध प्रकारची सावली देणारी व पर्यावरण पूरक झाडे लावण्यात आली स्मशानभूमी परिसर हिरवेगार व स्वच्छ ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले तसेच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली. या उपक्रमात स्मशानभूमी परिसरात शांत स्वच्छ आणि हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.यावेळी कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा प्राध्यापक व पर्यवेक्षिका डॉ. कमल .आर. पोटदुखी ,प्रा.डॉ.नलिनी भगत, प्रा. उमेश उईके. तसेच म्हसळा ग्रामपंचायत .प्रशासक सुनील .बी. गावंडे .ग्रामपंचायत सुधाकर आसोटकर .तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशा वर्कर सौ उज्वला पांतावणे.सौ सिंधू बागडे. तसेच क्षेत्र कार्य व ग्रुप मधील सर्व मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.




