मोठा पोलिसांचा फौजफाटा ; देवळीत अतिक्रमण हटाव मोहिम जोमात

सरकारी कर्मचारी तुपाशी , सामान्य नागरिक उपाशी
छोटे व्यावसायिकांचे घर उघड्यावर
देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य

देवळी शहरात अतिक्रमण केलेल्या जागेवर तसेच रोडलगत छोटे , मोठे कर्ज घेऊन दुकाने थाटली होती त्यावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नगर परिषद कर्मचारी व पोलिस अधिकारी , दंगल नियंत्रण चमू त्याचप्रमाणे पोलिसांचा फौजफाटा तैनात झाल्याने देवळी शहरातील सामान्य नागरिकात एकच खळबळ उडाली त्यामुळे सरकारी कर्मचारी तुपाशी तर सामान्य नागरिक उपाशी अशी अवस्था दिसत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की एक तर आम्हाला दुकाने लाऊ देऊ नका लावली तर मोठ्या प्रमाणात आमच्याकडून दुकानाचा नगर परिषद कर घेत बुलडोझर लावून अतिक्रमण करून आम्हाला उघड्यावर आणले त्यामुळे समोर आर्थिक संकट उभे राहणार आहे. शारीरिक ,मानसिक , आरोग्यावर परिणाम होणार असल्याने याला सर्वस्वी जिल्हाधिकारी , जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासन , लोकप्रतीनिधी जबाबदार राहील अशी नागरिकात चर्चा रंगू लागली. एकीकडे रोजगार नाही दुसरीकडे रोजगार तयार केला त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली त्यातून काही लोकांचे दुकानाचे नुकसान झाले. आणि सामान्य , छोटे व्यावसायिकांना उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न समोर उभा झाला. असून अतिक्रमण मोहीम पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.






