देवळी सत्यदूत वृत्त.सुवर्णा पाटील

वर्धा सिद्धार्थ नगर चौक मित्र परिवार वर्धा द्वारा आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या135 व्या जयंती निमित्त दिनांक 22 एप्रिल 2026 ला भीम गीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होते. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक(नागपूर ) फैजान ताज फेम. भीम का संविधान है यांनी एका पेक्षा अनेक बुद्ध भीम गीते सादर केली. यावेळी वर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांच्या हस्ते गायक फैजान ताज यांना भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वर्धा नगर परिषदचे अध्यक्ष सुधीर पांगुळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा लोकसभा क्षेत्राचे तडफदार युवा खासदार अमर काळे यांच्या हस्ते महामानवाच्या फोटो ला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती समाज सेवक विशाल रामटेके,विलास जवादे,राष्ट्रपाल वासेकर व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.






