देवळी सत्यदूत वृत्त : सचिन वैद्य
देवळी – काल रोजी बोपापुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थित गावाची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला होता. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली होती. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” ला सुरुवात करण्यात आली होती.
या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा थोडक्यात सांगायचं काम झालं तर विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे, लोकांचे जीवनमान उंचावणे, नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे जसे आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे. इत्यादी घटकांचा समावेश मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या मध्ये केला गेला होता.
याच अनुषंगाने बोपापुर येथे झालेल्या कामाची पाहणी करिता बोपापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमण पराग सर तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी बोपापुर येथे भेट दिले असता ग्राम पंचायत, जि. प. प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी सौंदर्रिकरण, कोल्हापुरी बंधारा व व्यायाम शाळा इत्यादी घटकांची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरीक विनोद दांदडे, ग्रा.प. सचिव वैशाली चुटे , उपसरपंच लिलाधर डबले, गावातील पोलिस पाटील सचिन वडतकर, ग्राम पंचायत सदस्य अशोक पचारे, रामेश्वर मडावी व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






