घुसळी कामनापूर जिल्हापरिषद शाळेला १ लाख रुपयांची मदत
देवळी सत्यदूत वृत्त. सुयोग ठाकरे
तळेगाव दशासर : कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे नाविन्यपूर्ण कल्पकतेतून सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहेत. त्याची प्रचीती म्हणजे त्यांनी १ फेब्रुवारी २०२६ घुसळी कामनापूर धामणगाव रेल्वे, अमरावती येथील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर, समृद्ध, गुणवत्तापूर्ण, प्रेरणादायी, उपक्रमशील ,आदर्श बनविण्यासाठी संकल्प सोहळा घेऊन या कार्यक्रमाला वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाचे आयोजन केलें. या कार्यक्रमात आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्त्वाप्रमाणे गोरगरिबांची मुलं शिक्षणात मांगे राहू नये, व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद न पडता त्या आदर्श मुले घडविणाऱ्या असाव्या हा दृष्टीकोण ठेवून १ लाख रुपयांची मदत कबुल करत पहिला २५ हजार रुपयांचा धनादेश गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या हाती स्वाधीन केला व उर्वरित रक्कम शाळेचे काम जसजसे समोर जाईल त्याप्रमाणे तीन टप्प्यात देण्याचे काबुल केले व आता गावातील लोकांनी या चांगल्या कार्यासाठी आर्थिक सहकार्य करण्यास समोर यावे असे पंकज ठाकरे यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात आव्हान केले..हास्य वऱ्हाडी कवी संमेलनात महाराष्ट्राचे युवा आयकॉन मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा फेम अनंत राऊत अकोला यांनी आपल्या कवितांनी गावांतील मंडळींना मंत्रमुग्ध केले त्यांच्या सोबतच कवी प्रा. संजय कावरे मंगरुळपीर, नितीन वरणकर शेगाव गोपाल मापारी अकोला यांनी आपलं गाव व आपल्या गावची शाळा आदर्श कशी असावी यासाठी आपल्या कवितेतून सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. सुधीर बायस्कर प्राचार्य आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे, प्रमुख उपस्थितीमध्ये किरणजी आवटे ठाणेदार तळेगाव दशासर व अनेक प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. विनोद तितरे जिल्हाध्यक्ष कर्मयोगी फाऊंडेशन , त्यांचे सहकारी व गावकरी मंडळी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली व लोकसहभागातून घुसळी कामनापूर येथील जिल्हापरिषद शाळा आदर्श करू असा ध्येयवादी संकल्प केला.






