देवळी सत्यदूत वृत्त
अमोल ठाकरे
वर्धा : स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे द्वारा आयोजित 69 वी आंतरशालेय राष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धा 2025 – 26 पोलीस सब हेडक्वार्टर ग्राउंड बऱ्हाणपूर, बारामती पुणे येथे कराटे – दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष शिहान सल्लाउद्दीन अंसारी व महासचिव शिहान संदीप गाडे सर यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या संपन्न झाली. मागील 69 वर्षात वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकही सुवर्ण पदक मिळालं नव्हतं परंतु यावर्षी पहिल्यांदाच एक नव्हे तर तब्बल पाच सुवर्णपदकाची कमाई वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी केली. वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच 19 वर्षाआतील मुले गटात पियूष सिंग, 17 वर्षाआतील गटात नैतिक राऊत, मोहिनी चुटे, देवांशु लाखे, कैवल्य सागरकर यांनी आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करीत या पाच खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले. मागील 69 वर्षात एकही सुवर्णपदक प्राप्त न करणाऱ्या वर्धा जिल्ह्याने यावर्षी संपूर्ण भारतात सर्वात जास्त गोल्ड मेडल प्राप्त करणारा जिल्हा ठरला आहे. तसेच राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये खेळाडूंचे 5 % आरक्षण निश्चित झाल्याबद्दल. वर्धा जिल्ह्यात कराटे क्रीडा प्रेमीत उत्साहाचे वातावरण आहे. या सर्व खेळाडूंच्या वर्धा आगमनानिमित्त वर्धा जिल्ह्यातील मान्यताप्राप्त एकमेव कराटे संस्था “कराटे -डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा” तर्फे स्वागत व सत्कार सोहळा रॅलीचे आयोजन मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता बजाज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अधिकृत स्वागत व सत्काराचा सोहळा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पार पडला. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, सांजली वानखेडे, देवळीचे तालुका क्रीडा अधिकारी गणेश येलावार, क्रीडा अधिकारी जमील अकत्तर, क्रीडा शिक्षक योगिता तागडे, जवान कॅरिअर अकॅडमी चे संचालक प्रवीण पेठे, कराटे -डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक सेन्साई निलेश राऊत, अध्यक्ष सेन्साई काशिनाथ रघाटाटे, सचिव शिहान मंगेश भोंगाडे, प्रशिक्षक सेन्साई ऋषभ सावसाकडे, शिहान रमेश भगत, सेन्साई पराग पाटील, सेन्साई चेतन जाधव, प्रणय विटणकर, कार्तिक भगत, समीर साहू व इत्यादी प्रशिक्षक उपस्थित होते. खेळाडूंनी पदक प्राप्त केल्यानंतर वर्धा आगमनानिमित्त वर्धा कला महोत्सवचे अध्यक्ष संदीप चिचाटे, लायन्स क्लबचे संचालक तथा उद्योजक अनिल नरेडी, समाजसेवी अंबिका हिंगमिरे, लायन्स क्लब गांधी सिटीचे कोषाध्यक्ष मनोज तेलहांडे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मोहन मोहिते व इत्यादींनी बजाज चौक येथे खेळाडूंना पुष्पगुच्छ व हार घालून स्वागत केले. रॅलीत व स्वागत सत्कार कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षक, सिनियर खेळाडू, विजय खेळाडूंचे पालक व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय कराटे – दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कराटे -डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व पदाधिकारी, मुख्य प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व माता पितांना दिले. वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंच्या या ऐतिहासिक घवघवीत यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉ. पंकज भोयर, देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकर प्रसादजी अग्निहोत्री, वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. आशा मेश्राम मॅडम, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही, लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष विजय सत्याम, एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे, महात्मा फुले प्रतिष्ठान वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष सौ. रोहिणीताई पाटील, बोरगाव मेघे चे माजी सरपंच संतोष सेलुकर, पिपरी मेघे चे माजी सरपंच सतीश इखार, डॉक्टर सचिन पावडे, डॉक्टर प्रदीप कश्यप, शायनींग स्टार स्कूलचे संचालक समीर शेंडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधरजी पाटील, किक बॉक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कृष्णा ढोबळे, विश्व सिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आहुजा, ब्राह्मण सभा वर्धेचे अध्यक्ष विलास कुलकर्णी, नगरसेवक सौ. वंदनाताई भुते, माजी शिक्षण सभापती श्रेयाताई देशमुख आधी अनेक मान्यवरांनी निवासस्थानी भेट देऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.






