गजानन मंदिरात भागवत कथेचा समारोप”
देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य
वर्धा, क्रोध व अहंकार हे माणसाचे खरे शत्रु आहे. क्रोध व अहंकारामुळे माणसाला विवेकाचा विसर पडतो. आपण असा आचरण करु नये ज्यामुळे दुसऱ्यांना दुःख किंवा त्रास होईल, असाव्यवहार आपणास केव्हाही खुशी अथवा आनंद देवू शकत नाही. मानवाला जे मनुष्य शरीर प्राप्त झालार आहे. ते ईश्वराचे वरदान आहे. सृष्टीकर्ता देवानी आपल्या महान कुशलतेव्दारे असे दुर्लभ शक्तीशाली मानव शरीर आणि सर्व प्राण्यापेक्षा सर्वोत्तम बुध्दी प्रदान केली आहे. देवानी दिलेल्या अमुल्य शरीर आणि बुध्दी चे सदुपयोग करुन सच्चे सुख प्राप्त करणे हे आपल्या हाती आहे. जीवन जगणे ही एक कला आहे. जी आपल्याला श्रीमद भागवत कथेतुन शिकायला मिळते. सामाजिक सेवा ही एक ईश्वरी सेवा आहे. व्यक्तीचा मोठेपणा त्याचे धनसंपत्ती किंवा पदावरुन ओळखण्यापेक्षा त्याचे निगर्वी आणि अंकार रहित वागणुकी वरून ठरत असते. खरे आनंद धन संपत्ती नसुन परोपकारी जीवन जगण्यात आहे. आणि आपले परोपकारी आचरण हे सुख जिवनाची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन जेष्ठ समाज सेवक मोहनबाबु अग्रवाल यांनी केले. मगन वाडी चौक स्थित श्री संत गजानन महाराज मंदिर मध्ये श्री चे १४८ वे प्रगट दिनाप्रित्यर्थ आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी झांसी महामंडलेश्वर मंजुलता देवीजी देवस्थानचे सचिव ज्ञानेश्वर पहाडे, कोषाध्यक्ष सुशिल व्यास, ट्रस्टी मधुसुदन अग्रवाल, ब्रम्हकुमारी वर्धा सेंटर इंजार्ज माधुरी दिदी आदि मंचावर उपस्थित होते.यावेळी ब्रम्हकुमारी माधुरी दिदी म्हणाल्याकी यशस्वी होण्याकरिता दुसऱ्याचे दोष काढण्याची दृष्टी सोडून गुणग्राहकतेची दृष्टी ठेवली पाहिजे. दुसऱ्याच्या कामाची प्रशंसा केली पाहिजे दुसऱ्याला नेहमी सन्मानाने वागविले पाहिजे जीवनात आनंद व शांती प्राप्त करण्याकरिता आध्यात्माचा मार्ग अवलंब केला पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर पहाडे यांनी केले. या प्रसंगी मंदिर ट्रस्ट तर्फे भागवताचार्य महा मंडलेश्वर मंजुलतादेवी आणि ब्र.कु. माधुरी दिदी यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला आरती झाल्यावर उपस्थित हजारो भाविक भक्तांना प्रसाद वितरीत करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बाबाराव फाले, अजय लांबट, महेश राठी, संजय कावळे, अरविंद पाल, किशोर दौड, सुरेश मुंजेवार, सौ. पुष्पा आष्टनकर, सौ. अर्चना लांबट, सौ. रेखा अमृतकर, कल्पना पोकळे, सुनिल गावंडे, विजय बोबडे, अंबादास तळवेकर, अशोक फुलमाळी, सौ. पुष्पा भडंग, आशा तेलंग, राजेंद्र धनुष्कर, श्याम व्यास, राजु कानेटकर, आदिनी सहकार्य केले. श्रीचा प्रगटदिन असल्यामुळे हजारो भाविक भक्तांनी दर्शना करिता गर्दी केली होती.






