वर्धा:- प्रविण दंडाळे
वर्धा -आर्वी मुख्य रस्त्यावर खरांगणा (मोरांगणा) मध्ये एकही गतिरोधक नसल्याने भरधाव वाहने वाहत असतात. खरांगणा सारख्या वाहतुकीच्या मार्गावर मार्केट लाईन असुन पोलीस स्टेशन तसेच पेट्रोल पंप आहे. वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्ये करत आहेत.






