महत्वाची सुचना:- तलाठी कार्यालय खरांगणा चे कोतवाल कार्यालय करण्यात आले आहे. तरी फक्त कोतवालांना भेट देण्यासाठी हे कार्यालय नेहमी तुमच्या सेवेशी…वर्धा:- प्रविण दंडाळे खरांगणा (मोरांगणा):- तलाठी कार्यालय खरांगणा चे मंडळ अधिकारी सहीत तलाठी वेळेचे पालन न करता घरी बसून सुस्त. खरांगणा मंडळात एकुण सहा साझा असुन पाच तलाठी नेमले आहेत. त्यानुसार सहा साझा साठी प्रत्येकी एक असे सहा कोतवाल नेमले आहेत. पण तलाठी कार्यालयात फक्त कोतवाल हजर असतात. पण जिम्मेदार अधिकारी एकही नसतो. कधी १२ वाजता येतात, तर कधी येत सुद्धा नाही. आणि फोन केला तर आमची वर्धा येथे ड्युटी लागली तर कोणी मिटींग आहे असे सांगून नेहमी टाळाटाळ करतात. शेड्युल मागितला तर शेड्युल नाही आहे म्हणून फेटाळून लावते. हालचाल रजिस्टर तर आहेच नाही. इतकेच नव्हे तर कोतवालांना सुध्दा यांच्या शेड्युल बद्दल काही सांगत नाही. कोतवालांना जर सुचना दिली तर ते आपल्या गावातील वास्टअप ग्रुप वर माहिती टाकू शकतो.
महत्वाची सुचना:- तलाठी कार्यालय खरांगणा चे कोतवाल कार्यालय करण्यात आले आहे. तरी फक्त कोतवालांना भेट देण्यासाठी हे कार्यालय नेहमी तुमच्या सेवेशी…
वर्धा:- प्रविण दंडाळे
खरांगणा (मोरांगणा):- तलाठी कार्यालय खरांगणा चे मंडळ अधिकारी सहीत तलाठी वेळेचे पालन न करता घरी बसून सुस्त. खरांगणा मंडळात एकुण सहा साझा असुन पाच तलाठी नेमले आहेत. त्यानुसार सहा साझा साठी प्रत्येकी एक असे सहा कोतवाल नेमले आहेत. पण तलाठी कार्यालयात फक्त कोतवाल हजर असतात. पण जिम्मेदार अधिकारी एकही नसतो. कधी १२ वाजता येतात, तर कधी येत सुद्धा नाही. आणि फोन केला तर आमची वर्धा येथे ड्युटी लागली तर कोणी मिटींग आहे असे सांगून नेहमी टाळाटाळ करतात. शेड्युल मागितला तर शेड्युल नाही आहे म्हणून फेटाळून लावते. हालचाल रजिस्टर तर आहेच नाही. इतकेच नव्हे तर कोतवालांना सुध्दा यांच्या शेड्युल बद्दल काही सांगत नाही. कोतवालांना जर सुचना दिली तर ते आपल्या गावातील वास्टअप ग्रुप वर माहिती टाकू शकतो.






