देवळी सत्यदूत वृत्त.
सचिन वैद्य
देवळी तालुक्यातील गौळ येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2026 ला श्री संत भदाजी महाराज व महादेव बाबा सच्चीदानंद खटेश्वर महाराज तपोभूमी मठ श्रीक्षेत्र गौळ येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिना निमित्त मूर्ती प्रतिष्ठान व प्रगट दिन महोत्सव साजरा करण्यात आला.7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संत गजानन महाराज मूर्तीची गावांमधून शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत त महिला मंडळ व गावातील नागरिक सहभागी झाले होते. सकाळी 5 वाजता शंकर बोंडे यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठान व पूजेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ब्रह्म वृंद हभप गणेश महाराज आकोटकर पूजाविधी करण्यात आली. सायंकाळी विघ्नहर्ता म्युझिक ग्रुप वर्धा चे संचालक व गायक सुहास इंगळे यांच्या संचांनी रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत सदाबहार गीत गायन केले. यावेळी विदर्भाच्या प्रसिद्ध गायिका उज्वला मुंगले , गायक पिंटू मामा हटीटेल यांच्या गीत गायनाला साथ संगत ढोल आणि तबलावादक प्रवीण पायघन,ऑक्टोपॅड वादक विशाल शेंडे, कीबोर्ड वादक वैभव झाडे, ढोल वादक चंदन बावणे यांनी दिली. यावेळी गौळ परिसरातील कोळोना चोरे, आडेगाव, दापोरी, चिखली, परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते आशिष कसनारे यांनी केले होते. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.






