देवळी सत्यदूत वृत्त. सचिन वैद्य
वर्धा : भारताचा हिरकमहोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने चेतन सुभाष कोहले रा पांढुर्णा मध्यप्रदेश आणी गौरी साहेबराव मडावी आष्टी जि वर्धा या प्रेमविरांचा 75 वा सत्यशोधकी विवाह वर्धेतील भव्यदिव्य अशा सरोज सभागृहाचे येथे सरोज किटे व बाबाराव किटे याच्या पुढाकाराने मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लावून देण्यात आला चेतन हा वडेगाव जिल्हा पांढुर्णा मध्यप्रदेश येथील राहणारा तर गौरी हि आष्टी जि वर्धा येथे राहणारी चेतनचे जाणे येणे नातेवाईक असलेल्या मावशीकडे आष्टी येथे होते अशावेळी गौरीसोबत तोंड ओळख झाली त्यातून ओळख वाढली,भेटी गाढी वाढल्या त्यातून एकमेकांविषयी आकर्षण वाढत गेले केव्हा त्याचे रूपांतर प्रेमात झाले हे कळले नाही आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हि तिव्र भावणा दोघांमध्ये निर्माण झाली सारे जग शत्रू वाटू लागले याची कुणकुण दोघांच्याही कुटूंबाला लागताच विरोध होवू लागला कारण दोघांचाही धर्म हिंदू पण जात वेगवेगळी रोटी व्यवहार चालतो पण बेटी व्यवहार नकोच त्यामुळे आपण विवाह करायचा असा निक्ष्चय केला अशातच चेतना विकास संस्थेच्या कार्यकर्त्या यांना हि बाब समजताच तिने समुपदेशन करून अशा प्रकारचे विवाह लावून देणारे गजेंद्र सुरकार यांच्याशी संपर्क साधून विवाह लावून देण्याची विनंती केली त्यांनी सर्व कागदपत्रे तपासून चेतन व गौरी हिच्याशी बोलून सत्यस्थिती जाणून घेवून होकार दिला हि बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मा बाबाराव किटे यांच्या जवळ सांगताच त्यांनी व सरोज किटे ह्यांनी हा 75 वा सत्यशोधकी विवाह आमच्याच सरोज सभागृह येथे पार पाडावा याचा आग्रह केला सर्व कायदेशीर प्रक्रिया गजेंद्र सुरकार यांनी पार पाडून सत्यशोधकी विवाहाचे सोपस्कार सप्तपदी, शपथविधी, कल्पना सातव फुसाटे, डॉ माधुरी झाडे ,नंदा नरांजे, डॉ मंजुषा देशमुख यांनी यशस्वीपणे पार पाडली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक डॉ चावरे, नगरसेवक व सभापती मा सौ.खंगार प्रामुख्याने उपस्थित होते तर मंचावर बाबाराव किटे, सरोज किटे गजेंद्र सुरकार,मा अरूणभाऊ चवडे, अरूणकुमार हर्षबोधी ,भाई रजनीकांत आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून चेतन व गौरी यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सुनील ढाले यांनी केले आभार प्रदर्शन डा हरिश पेटकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक हेडावू, रजनी सुरकार, मनिष फुसाटे, संजय भगत,धावंजेवार, अनिकेत खेडकर,दिपाली गुळघाणे, मिना डोरले,खान साहाब,दिलीप गुळघाणे,तिवारी इत्यादिंनी परिश्रम घेवून हा विवाह यशस्वीपणे पार पाडला






