देवळी सत्यदूत वृत्त.रेणुका दूरबुडे
वर्धा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्राचीन काळापासून महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या ढगा येथील ‘लहान महादेव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिर परिसरात महाशिवरात्री यात्रा भरते व या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी सेवा प्रकल्प प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून ‘महाशिवरात्री सेवा प्रकल्प’ राबविण्यात येतो. यावर्षी एक लाखाहून अधिक भाविकांनी आपली हजेरी लावून दर्शन घेतले.महाशिवरात्रि सेवा प्रकल्पात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रांगेत उभे करणे, चौरागडावर चढण्याकरिता वृद्ध अपंग महिला मदत करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, प्रथमोपचार सेवा केंद्र, यात्रेत शिस्त टिकविणे व वनसंपत्तीचे संवर्धन करणे याबाबत जनजागृती इत्यादी उपक्रम प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान यात्रेत राबवून 16 फेब्रुवारी रोजी यात्रेत झालेला कचरा, पॉलिथिन, पाण्याच्या बॉटल्स व बेलफूल गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.महाशिवरात्री सेवा प्रकल्पाचे नेतृत्व प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, प्रहार संस्थेचे सचिव तथा रोव्हर लीडर संतोष तुरक, प्रहार संस्थेचे कोषाध्यक्ष तथा राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र गुजरकर, संस्थेचे प्रसिद्ध अधिकारी गणेश शेंडे व संचालक डॉक्टर राजेंद्र बोरकर यांनी करून यात्रा यशस्वी केली.प्रहारच्या महाशिवरात्री सेवा प्रकल्पात देवळीच्या एस एस जे महाविद्यालयातील तसेच सिंदी रेल्वे येथील केशरीमल नगर कनिष्ठ महाविद्यालयातील रोव्हर्स, रेंजर्स,राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व प्रहारच्या ४५ स्वयंसेवकांचा समावेश होता. ज्यात रेंजर लीडर कल्याणी लिखार, उदय काळे, सत्तेश्वरी सावरकर, तेजस वाघाडे, पंकज पवार, साहिल जगनाडे, राधिका नागोसे, तनिषा उईके, राम देशमुख, प्रवेश किटे, सोमेश्वर पोराटे, स्नेहा मडकाम, आरती मरघडे, दर्शना कदम, भूषण ठोके, विपुल पेंदाम, यामिनी पारधी यांच्यासह रोव्हर्स व रेंजर्स यांनी सदर प्रकल्प यशस्वी केला.






