देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य
वर्धा जिल्ह्यातील देवळी तहसीलमधील तांभा ते विजयगोपाल रोडची दयनीय अवस्था गावकऱ्यांचा संताप प्रशासनाकडे जलंद दुरुस्तीची मागणी तांभा गावातून विजय गोपालकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी भरलेला असून वाहनधारकांना अत्यंत त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागत आहे रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की दुचाकी चालवण्याचीही इच्छा होत नाही अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली रस्त्यांचा वापर रोज शेकडो नागरिक विद्यार्थी व शेतकरी करत असून रस्त्याच्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाकडे त्वरित लक्ष घालावे अशी एक मुखी मागणी होत आहे. या संदर्भात मनसे शाखा अध्यक्ष तांभा प्रमोद मडावी यांनाही जोरदार भूमिका घेत रस्ता तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.





