छत्तीसगड राज्याचे उपमुख्यमंत्री अरुण साव यांच्या हस्ते राष्ट्रीय चषक स्वीकारताना कॅप्टन मोहन गुजरकर व मंजुषा जाधव

सचिन वैद्य
देवळी सत्यदूत वृत्त.
वर्धा:- नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यातील छत्तीसगड राज्यातील बालोद इथे संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या रोव्हर रेंजर चमूने विविध उपक्रमात व स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय चषक पटकावले. सदर चषक छत्तीसगढ राज्याचे उपमुख्यमंत्री अरुण साव व शिक्षण मंत्री गजेंद्र यादव यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे रोव्हर स्काऊटचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्राच्या चमुचे प्रमुख कॅप्टन मोहन गुजरकर व गाईड संघटक मंजुषा जाधव यांना समारोपीय कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईडचे राष्ट्रीय मुख्य आयुक्त के.के खंडेलवाल, उपाध्यक्ष तथा कर्नाटक राज्याचे माजी गृहमंत्री पी.जी सिंधिया उपस्थित होते

सदर राष्ट्रीय रोव्हर रेंजर जम्बुरीचे आयोजन छत्तीसगड राज्याने केले असून यात संपूर्ण देशातून 3000 युवक युतीने भाग घेतला होता. ज्यात महाराष्ट्र राज्यातून तीनशे रोव्हर्स रेंजर्स सहभागी झाले होते.
महाराष्ट्राची चमु महाराष्ट्र भारत स्काऊट गाईड चे राज्य मुक्ता आयुक्त शितल तेली उगले, राज्य सचिव तथा क्रीडा सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, राज्य संघटन आयुक्त अरुण सप्ताळे व राज्यसह सचिव सारिका बांगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती.
सदर जांभोरीत विविध स्पर्धांचे तसेच रेंजर अभ्यासक्रमावर आधारित उपक्रमांची स्पर्धा घेण्यात आली होती त्यात सर्व स्पर्धा व उपक्रमात रेंजर्स सहभागी होऊन दहा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले व महाराष्ट्र राज्य करिता दहा उपक्रमात राष्ट्रीय स्तरावरील ध्वज प्राप्त केले.
सदर जांबोरीत पथसंचलन, लोकनृत्य, कॅम्प क्राफ्ट, कॅम्प फायर यात ‘अ’ श्रेणी तर बिन भांड्यांचा स्वयंपाक, पायोनियरिंग, राज्य गेट, कलर पार्टी, मार्च पास्ट व इथनिक फॅशन शो मध्ये ‘ब’ श्रेणी प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचा गौरव वाढविला.
सदर राष्ट्रीय जांभोरीत महाराष्ट्र रोव्हर रेंजर चे चमु कॅप्टन मोहन गुजरकर व संघटक मंजुषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा संघटक नितेश झाडे, गोंदिया जिल्हा संघटक पराग खुजे, नाशिक जिल्हा संघटक कविता वाघ, अमरावती जिल्हा संघटक प्रीती गोल्हर, रोव्हर लीडर संतोष तुरक व सीनियर रोव्हर लीडर प्रा. रवींद्र गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोव्हर्स रेंजर्सने विविध उपक्रमात व स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले.
सदर जम्बुरीचे उद्घाटन छत्तीसगड राज्याचे राज्यपाल रमण डेका व मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी केले तर समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अरुण साव व शिक्षण मंत्री राजेंद्र यादव उपस्थित होते.
रोव्हर रेंजर चे नेतृत्व रेंजर लीडर कल्याणी लिखार, आदर्श नाईक, मनोज नेहारे, आदित्य तांगडगे, रोव्हर लीडर ताजने,रितेश बुटे यांनी केले असून वैष्णवी कन्नाके, स्नेहा मडकाम, आरती मरघडे, सत्येश्वरी सावरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यातील रोव्हर रेंजर सहभागी झाले होते.
यशस्वीते करिता यामिनी पारधी, राधिका नागोसे, पूर्वा कापटे, अनुश्री खंडरे, पायल चौके, पंकज पवार, तेजस वाघाडे, भूषण ठोके यांच्यासह रोव्हर्स रेंजर्स नी अथक प्रयत्न केले.






