देवळी सत्यदूत वृत्त.रवींद्र पारिसे

देवळी तालुक्यातील चिखली गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथी प्रमाणे ) 8 मार्च सप्त खंजरी वादक व राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराजांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन चिखली येथील उपसरपंच तथा शिवसेना देवळी तालुका प्रमुख घनश्यामजी वडतकर (पाटील), यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नातेवाईक व परिसरातील नागरिकांना संदेशात्मक हा कार्यक्रम ठरणार आहे . सत्यपाल महाराजांची सत्यवाणी ऐकण्या करीता पाथरीचे बहुजन कला मंचाचे संचालक नारायण जारुंडे, वर्धेचे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे व इतर कलावंत उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 7 ते 10 या वेळात पार पडणार असून श्री हनुमान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ चिखली येथे होणार आहे तेव्हा देवळी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान घनश्यामजी वडतकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे.






