देवळी सत्यदूत वृत्त.
छाया नरड

नागपूर:
यवतमाळ येथील बाबाजी दाते महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील संशोधक प्रा. मयुरी नंदकुमार ठाकरे (गावंडे) यांनी भूगोल विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी “यवतमाळ जिल्ह्यातील कृषीवर रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढत्या वापराचा मृदा व जलसंपदेवरील दुष्परिणाम” या विषयावर संशोधन केले.
हे संशोधन कार्य संशोधन मार्गदर्शक डॉ. कल्पना देशमुख, बाबाजी दाते महाविद्यालय, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. सदर संशोधनात यवतमाळ जिल्ह्यातील कृषी पद्धती, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे मृदेची गुणवत्ता व जलस्रोतांवर होणारे परिणाम यांचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे.
या संशोधनास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू, डॉ. चंद्रशेखर ठाकरे, बाभुळगाव डॉ. कल्पना देशमुख, नागपूर, डॉ. चेतन राऊत, नागपूर आणि कुटुंबातील सदस्य यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

प्रा. मयुरी नंदकुमार ठाकरे (गावंडे)यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल बाबाजी दाते महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, संशोधक सहकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत भर पडली असून भविष्यात त्यांच्याकडून भूगोल विषयातील संशोधन व अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






