देवळी सत्यदूत वृत्त.प्रतिनिधी: आशिष जाचक

वर्धा , अखिल भारतीय मराठा महासंघ कडून श्रीनगर लेआऊट वार्ड नं.४ हनुमान मंदिर देवस्थान येथे जागतिक महिलादिना निमित्त स्त्रियांच्या अस्तित्वाच्या शक्तीचा जागर दिवस म्हणून साजरा करण्यात आला.महिलादिवस म्हणजे एका दिवसाचा उत्सव नसुन स्त्रीयांच्या कष्टाचा आणि तीच्या सन्मानचा उत्सव आहे.नारी म्हणजे शक्ती,प्रेम, पुजा,समर्पण,करुणा सर्वस्व अशा महाननारी शक्तीला वंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्थमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून माॅ.साहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रमुख वक्ते म्हणून स्किल इंडियाच्या मार्गदर्शिका निलीमा मुनोत यांनी आपल्या विचारातून स्त्रियानी आपल्या सुप्त गुणांना ओळखले पाहिजे तिने तिच्या कलागुणांना ओळखून आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे.तसेच वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल ज्योती निनावे यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी कुठल्या प्रकारे जबाबदारी उचलली पाहिजे आणि आपली सुरक्षितता कशा प्रकारे करावी या बद्दल मार्गदर्शन केले.रणरागिणी महिला मंचच्या संगीता बढे यांनी महिलांना कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते.महिलांनी कुठल्या प्रकारे योग्य तो कायदाचा उपयोग कसा करायचा सांगितले. नालवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा माउसकर यांनी महिला प्रत्येक क्षेत्रात समोर जात असते.काहि स्त्रिया नोकरी करतात आपण त्यांना पाहुन आपणही काही केले पाहिजे जीवनात समोर जाण्यासाठी काही पावले उचलली पाहिजेत. तसेच अखिल भारतीय मराठा महांसघ महिलाजिल्हाअध्यक्ष शैलजाताई साळुंके यांनी स्त्री ही जवाबदारीत बांधलेली असते,आपले कर्तृत्व ठामपणे निभावत असते मग ती आई,बहीण, मुलगी, सुन असो प्रत्येक भुमिका ठामपणे निभवत असते.अ.भा.म.महासघ महासचिव व मंगलमा गृप यांनी स्त्रीला आपला स्वत:चा व्यवसाय केला पाहिजे.छोट्या छोट्या गोष्टीतून आपला व्यवसाय सुरु करु शकतो आणि स्त्री सक्षम बनु शकते.तसेच अ.भा.मराठा महासंघ च्या महिला पदाधिकारचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया गायकवाड,संचालन शहर उपाध्यक्ष अभिता शिंदे तर आभार प्रदर्शन कीॅती सोलंकी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी शहर अध्यक्ष भारती चांदुरकर, शहर उपाध्यक्ष भाग्य्श्री निघडे सरचिटणीस देवयानी वानोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.जया जाधव, रेखा मोहिते,भारती साळुंके,वंदना अहेरराव, पुजा मोहिते, पुनम शिंदे,प्रिती चव्हाण, किशोरी डफळे, शीतल बढे,अर्चना देवढे,वंदना चामटकर,अंजली सुरकार, छाया ऐकापुरे,चंदा डेकाटे, कमल जामनकर, प्रभा गांवडे,राधा लांबट,कांता पंडित, रेखा दरणे,राधा कठाणे, जयश्री लोंढे, योगिता पर्बत, मीना भोयर,प्रिया गैरखेडे, कल्पना कामनापुरे, माधुरी घिनमिने,शीतल चावरे,अग्निहोत्री,थोटेताई, रुपाली रहाटे इ.कार्यक्रमास उपस्थित होत्या.





