देवळी सत्यदूत वृत्त.रेणुका दुरबुडे

देवळी- देवळी ते दिघी या मार्गावरील रेल्वे स्टेशनजवळील अंडरपास रस्ता सध्या अत्यंत खराब व जीर्ण अवस्थेत आहे. या रस्त्यावरून महालक्ष्मी स्टील कंपनीचे पॉवर प्लांटच्या कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. त्यामुळे आज अचानक नगराध्यक्ष किरण ठाकरे यांचे नेतृत्वात परिसरातील शेतकरी व दिघी येथील गावाकऱ्यांनी देवळी ते दिघी रोडवर अंडरपास खाली दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण मुत्तेलवार यांनी घटनास्थळ गाठून नगराध्यक्ष किरण ठाकरे, सरपंच संदिप दिघीकर, गौरव खोपाळ, प्रविण खाडे यांचेशी चर्चा केली व त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचे सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले.या खराब रस्त्यामुळे परिसरातील शेतकरी, गावकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अनेक अपघात देखील झाले आहेत. व भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.सदर रस्त्याची तात्काळ पाहणी करून आवश्यक ती दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल व संभाव्य अपघात टाळता येतील. अशी मागणी किरण ठाकरे व इतरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण मुत्तेलवार यांच्याकडे केली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असलेल्या रोडचे डागडुजीचे काम त्वरित सुरु करतो व रेल्वे विभागाकडे येत असलेल्या रोडचे कामासंदर्भात रेल्वे विभागाशी आजच संपर्क करून त्यांचेशी बैठक लावून ते काम सुद्धा मार्गी लावण्याचे आशासन दिले व रस्तारोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी किरण ठाकरे यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती तात्काळ कार्यवाही न केल्यास नाईलाजाने आम्हाला रेल रोको आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. व होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी आपण जबाबदार राहाल असा इशारा देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले.यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांचेसह सरपंच संदिप दिघीकर, प्रविण कात्रे, गौरव खोपाळ, प्रविण खाडे, मंगेश वानखेडे, मधुकरराव खाडे, विठ्ठल लाकडे, पियुष लाटकर, अनिल गुजरकर, हरिभाऊ पाटणकर, रमेश काकडे, मनोहर खाडे, दिपक खाडे, संजय गवते, बालू तायवाडे, सुभाष सुरकार, सचिन मेघळ, महेश खोलाडे, महेश कुंडलवार, सचिन देशमुख, अविनाश सुरकार, मंगेश अवथरे, विजय कुमरे, सुनील जगताप, सुमित दिघीकर, शाहबाज शेख व इतर अनेक नागरिक उपस्थित होते.





