देवळी सत्यदूत वृत्त.
मनवर शेख

गिरड : येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाट्न नुकतेच पार पडले.
सतत दहा दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उदघाट्न जेष्ठ पत्रकार, मानव अधिकार आयोग वर्धा जिल्हा अध्यक्ष कादिर मामू, व शोध पत्रकार गजानन गारघाटे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विकास सोनकुसरे , जेष्ठ शिक्षक उमेश वाणी, प्रा अभिजित डाखोरे, मंथन भांदककर, शिबीर समन्वयक राजेंद्र कांबळे, रवींद्र गायकवाड, चांगले मॅडम, अंकित तडस यांची उपस्थिती होती.
द्विप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश वाणी यांनी केले.
उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शिबिरातून काय साध्य होईल यावर भाष्य केले.
सतत दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात कराटे, दांड पट्टा, कबड्डी, खोखो, चित्रकला, लेखन, हस्ताक्षर, नृत्य, गायन या सारखे संस्कार या शिबिरातून शिकविण्यात येणार आहे.
या शिबिरात वर्ग पाच ते बारावी पर्यंत विदयार्थी सहभागी झाले आहे.







