देवळी सत्यदूत वृत्त.
रेणुका दुरबुडे

वर्धा जिल्ह्यात दि. 21 व 22 एप्रिल पाथरी गावातील श्री गुरुदेव मंडळांच्या वतीने राष्ट्रसंतांची ग्राम जयंती ग्रामस्थांच्या वतीने पार पडली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे शेतात राब राबून मेहनत करणारा कष्टाळू बळी राजाचा हा जन्मदिवस राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ही मेहनत करणाऱ्या कष्टाळू पोशिंदाला अर्पण केली या संदर्भात हा ग्राम जयंतीचा कार्यक्रम गावातून मिरवणूक काढून गीतांच्या माध्यमातून संदेश देत पार पडली यामध्ये गावकरी व इतर बाहेर गाऊन आलेले सेवाभावी मंडळांनी सहभाग घेतला वर्धेचे दत्ताजी राऊत गिरोली चे अशोक सलामे अशोक हुडे पाथरीचे पो. पा. संजय चरडे नामदेव गोडे , अरुण निंबुळकार , बाबाराव कडू , अरुण चरडे , आशा निंबुळकार , शोभा चरडे , बाबा निंबुळकार , गीता चरडे , रेखा गोडे , सिंधू दंडारे , मंदा चरडे , देवका चौधरी , वनिता चरडे व इतरांनी सहभाग घेतला होता सामुदायिक प्रार्थनेसह ग्राम गीतेचे सुद्धा वाचन करण्यात आले यावेळी मानव मुक्ती बोध कला मंचचे उपाध्यक्ष नारायण जारुंडे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन ग्राम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.







