नृत्योत्सव 4 चे बक्षीस वितरण समारोह संपन्न

देवळी सत्यदूत वृत्त.
शंकर परचाके
वर्धा : शास्त्रीय नृत्य ही भारतीय संस्कृतीची अतिशय समृद्ध आणि प्राचीन परंपरा आहे. भरतनाट्यम, कथक, कुचिपुडी, ओडिसी यांसारख्या नृत्यप्रकारांमध्ये केवळ हालचाली नसून भाव, ताल, लय आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसून येतो. मात्र बदलत्या काळात आणि आधुनिक जीवनशैलीमुळे या कलेपासून तरुण पिढी काही प्रमाणात दूर जात असल्याचे दिसत होते. सचिन डान्स अकॅडमी व लायन्स क्लब गांधी सिटी द्वारा आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नृत्योत्सवात शास्त्रीय नृत्य स्पर्धेला प्राधान्य दिल्याने या नृत्य प्रकाराला एक प्रकारे नाव संजीवनी प्राप्त झाली आहे असे मत ज्येष्ठ समाज सेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज सभागृह नागठाणा येथे व्यक्त केले. या प्रसंगी वर्धा कला महोत्सव चे अध्यक्ष संदीप चिचाटे, समाजसेवक बाळा भाऊ माउस्कर, प्रदीप बजाज , मुख्य आयोजक प्रमोद वाकडे,प्राचार्य डॉ. गजानन जंगमवार, वंदना भुते , उषा फाले,अनुराग बजाज,मनीष जालान, वासुदेव कडुकर, पवन तिजारे,अक्षय गुप्ता ,लायन्स क्लब चे अनिल नरेडी, आशिष पोहणे,अतुल रुईकर , मनोज तेलहांडे,,माजी सरपंच प्रतिभा माऊस्कर,तुकाराम गोडे महाराज , जी जी प्रधान , अनुप जैस्वाल , दीपाली नागतोडे , सत्कार मूर्ती मंगेश भोंगाडे, निलेश राऊत,सचिन डंभारे ,रवीश गांधी आयोजक मयुरी वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नृत्योत्सव 4 मध्ये भरत नाट्यम, कुचीपुडी, सेमी क्लासिकल, वेस्टर्न , कंटेमनरी, या सारख्या नृत्याच्या 250 नृत्याचे सादरीकरण झाले. यात राघवी राऊळकर , पूर्वी नेवारे, जिया लोखंडे,ईशा गाढवकर, लक्ष्मी पिसुर्डे,चैत्रक्षी कलाने या स्थानिक कलाकारांनीही नृत्याच्या विविध प्रकारात पारितोषिके पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण अस्मिता काळे, हर्षदा उकळकर, प्रीतम विश्वास,ईशा हिरुडकर यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन कल्याणी टोणपे, अपेक्षा वाकडे यांनी केले तर आभार निखिल सातपुते यांनी मानले .
कार्यक्रमाला हजारो संख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपेक्षा वाकडे, संस्कृती वाकडे, अमोल देशपांडे, राधिका पंचभाई, अंकिता नंद, समर्थ कुकडे, सार्थक लाखे,शब्द धनके,लक्ष सिंग ,वैष्णवी खांगले , जय माहत्वाने , स्मिता चिचाटे, संजीवनी पोहाणे, अनघा रुईकर, प्रतिभा तेलहांडे यांनी परिश्रम घेतले.







